कोणत्या देशाचा प्रमुख कधी काय फतवा काढेल सांगता येत नाही. प्रमुख म्हटल्यावर देशाचे नियम ठरविण्याचा अधिकार असलेल्या एकाने आपल्या देशात एक अजब नियम लागू केला आहे. त्यामुळे या शहरातील नागरिक काळ्या रंगाच्या कार वापरु शकत नाहीत. विशेष म्हणजे अशाप्रकारे काळी कार वापरणे बेकायदेशीर असल्याचे त्याने म्हटले आहे. या देशाचे नाव तुर्कमेनिस्तान असून त्याच्या प्रमुखाचे नाव गुलबर्गी बर्डीमूमादेव असे आहे. देशाची राजधानी अश्गाबाट येथे हा अनोखा नियम लागू करण्यात आला आहे. अंधश्रद्धाळू असणारा हा प्रमुख पांढऱ्या रंगाच्या वस्तू वापरणे जास्त चांगले असते असे मानतो. गंमत म्हणजे आपल्या या हट्टापायी त्याने आपल्याकडे काम करणाऱ्यांना पांढरी कार खरेदी करण्यास सांगितले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews